कोण तुम्ही?
आधी तुम्ही कोण ते सांगा
का?
त्यावर ठरतं मी कोणे
अरे वा, असं असतं का? तुम्ही तुम्हीच असता आणि मी मीच.
ए येड्या, स्वतःला काय शिवाजी समजतो का, म्हणे मी मीच असतो!
मग परत सुरवात करू,
कोण तुम्ही?
आधी तुम्ही कोण ते सांगा
का?
त्यावर ठरतं मी कोणे
तू मुसलमान आहे तर मी हिंदू आहे
तू लिबरल आहे तर मी ट्रॅडिशनल
तू ब्राह्मण तर मी मराठा
तू हिंदी तर मी मराठी
म्हंजे मी ठरवायचं तू कोण आहे ते
आणि मी ठरवायचं तू कोण आहे ते
मग मी एक माणूस
मग मीही एक माणूस
डिनॉमिनेटर मोठा की न्यूमरेटर
तूच ठरवं
जितका डिनॉमिनेटर मोठा
तितका न्यूमरेटर आपोआप छोटा
तूच ठरव, तुला कोण हवाय
डिनॉमिनेटर की न्यूमरेटर
तू माणूस तर मीही माणूस
तुझ्या शिवाय मी माणूस नाही
आणि तुझ्याशिवाय मी.